देशासह जगभरातील स्त्रियांनी कठोर परिश्रम करुन यश मिळवलेले आहे. नोकरी आणि घर सांभाळताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत असते.
सध्या इंटरनेट वर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये महिलांनी चक्क साडी नसून फुटबॉल खेळण्याचा नवा पराक्रम केला आहे. जे व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल.

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे फुटबॉल सामने आयोजित करण्यात आले होते आणि त्याला ‘गोल इन साडी’ असं नाव देण्यात आलं होतं. व्हायरल व्हिडिओमध्ये महिलांचा एक ग्रुप रंगीबेरंगी साड्या परिधान केल्याचं दिसत आहे. शिवाय साड्यां नेसलेल्या महिला उत्कृष्ट पद्धतीने फुटबॉल खेळतानाही दिसत आहेत.