माणदेश एक्सप्रेस न्यूज : दि. ०१ एप्रिल २०२३ : विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना माईक बंद केला जातो असा आरोप ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी केला आहे.
पुढे बोत्लाना ते म्हणाले, विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना फारसं महत्त्वं दिलं जात नाही. त्याउलट राजकीय भाषणांसाठी खूप वेळ दिला जातो. ग्रामीण भागातील प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत फार वेळ दिला जात नाही.

या अधिवेशनात पूर्वी शेतकऱ्यांवर बराच वेळ चर्चा व्हायची. त्यांचे प्रश्न मांडले जायचे. परंतु एक दुर्दैवाची गोष्ट सांगतो. विधानसभेच्या अधिवेशनात राजकीय भाषणांसाठी एक-एक तास वेळ दिला जातो. परंतु प्रश्न मांडायचे असतील तर अर्धा ते एक मिनिटाला बेल वाजवली जाते.
शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा सर्वसामान्यांचे प्रश्न असतील तर लगेच बेल वाजवली जाते. सर्वसामान्यांच्या गोष्टी मांडायला गेल्यावर कधीकधी माईक देखील बंद केला जातो, यात बदल झाला पाहिजे.