IPL 2023, GT vs CSK : आयपीएल २०२३ ला आजपासून सुरुवात झाली असून गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आमने-सामने आले आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या चेन्नईच्या फलंदाजांनी गुजरातच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत २० षटकांत ७ विकेट्स गमावत १७८ धावा केल्या. चेन्नईचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकडवाडने गुजरातच्या गोलंदाजांवर चौफेर फटकेबाजी केली. परंतु तो ९२ धावांवर असताना गुजरातचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफने त्याला झेलबाद केलं.
गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीने चेन्नईसाठी सलामीला मैदानात उतरलेल्या कॉन्वेची अवघ्या एका धावेवर दांडी गुल केली. पण सलामीवीर ऋतुराजने मात्र गुजरातच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत ५० चेंडूत ९२ धावा कुटल्या. मोईन अलीनेही मैदानात फलंदाजीसाठी उतरताच मोठे फटके मारले आणि १७ चेंडूत २३ धावा केल्या. गुजरासाठी मोहम्मद शामीने दोन विकेट्स घेतल्या. शामीने कॉन्वे आणि शिवम दुबेला बाद केलं. तसंच राशिद खान आणि अल्झारी जोसेफलाही दोन विकेट्स मिळाल्या. तर जोशुआ लिटिलला एका विकेटवर समाधान मानावं लागलं. चेन्नईने २० षटकांत ७ विकेट्स गमावत १७८ जमविल्या.

धावांचा पाठलाग करताना Gujarat Titans ची सलामी जोडी वृद्धिमान साहा व शुभनम गिल यांनी धडाकेबाज सुरुवात केली. वृद्धीमान साहाने १६ चेंडूत 2 षटकार व 2 चौकार ठोकत २५ धावा केल्या. तो हंगारेकरचा बळी ठरला. एका बाजूने शुभनम गिलने धावा सुरूच ठेवल्या होत्या. साई सुदर्शन २२ धावा कडून हंगारेकरचा बळी ठरला. तर कर्णधार हर्धिक पंड्या केवळ ८ धावावर त्याला जडेजाने बोल्ड केले. शुभमन गिलने अर्धशतक साजरे करत ३६ चेंडूत ६ चौकार व ३ षटकार सह ६३ धावा केल्या.
शुभमन गिल बाद झाल्यावर सामना चेन्नई किंग च्या बाजूने झुकला होता. परंतु विजय शंकर २१ चेंडूत 2 चौकार व १ षटकार ठोकत २७ धावा केल्या. विजय शंकर बाद झाल्यावर राशीद खान आला त्याने चौकार षटकार ठोकत सामना Gujarat Titans च्या बाजूने झुकविला. शेवटच्या षटकात ६ चेंडूत ८ धावा असे समीकरण असताना राहुल तेवतियाने षटकार व चौकार ठोकत सामन्यात गुजरात टायटन्स विजय मिळवून दिला.
Match 1. Gujarat Titans Won by 5 Wicket(s) https://t.co/61QLtsnj3J #TATAIPL #GTvCSK #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2023