माणदेश एक्सप्रेस न्यूज : दि. ३१ मार्च २०२३ : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील लेंगरेवाडी येथे दुचाकी गाडीच्या आडवे कुत्रे आल्याने झालेल्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, आज दिनांक ३१ रोजी सकाळी ८.३० च्या दरम्यान श्रीमंत नामदेव लेंगरे वय ५२ हे त्यांच्या खोतवस्तीवरून लेंगरेवाडी गावामध्ये दुध घालणेस चालले होते. त्यांची दुचाकी लेंगरेवाडी गावानजीक आल्यावर त्यांच्या दुचाकीच्या आडवे कुत्रे आल्याने त्यांचा अपघात झाला.

अपघातानंतर त्यांना पुढील उपचारासाठी आटपाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु, त्यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. श्रीमंत नामदेव लेंगरे यांच्या अपघाती निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.