Latest Marathi News

BREAKING NEWS

उन्हाळ्यात सगळेच आवडीने खाणारे कलिंगड लालसर कसे केले जाते माहिती आहे? वाचा सविस्तर बातमी

0 1,369

मुंबई : उन्हाळ्यात चवीला गोड असणारे आणि पोटाला थंडावा देणाऱ्या कलिंगडाची मागणी प्रचंड असते. या मागणीचा फायदा घेत कच्चे कलिंगड केमिकल वापरून लाल केले जाते. आणि ते बाजारात सर्रास विकले जाते. त्यामुळे असे कलिंगड आरोग्यासाठी हानिकारक असतात.
उन्हाळ्यात उष्णतेचा परिणाम शरीरावर होत असतो. तेव्हा शरीर डिहायड्रेशनपासून वाचविण्यासाठी केमिकलयुक्त थंड पेयांपेक्षा लोकांना कलिंगड खाणे जास्त आवडते. शिवाय कलिंगडमध्ये ९२ टक्के पाणी असल्याने ते आरोग्यासाठी फायदेशीर असते.

बाजारात अद्याप हवी तशी कलिंगडाची आवक झालेली नाही. सध्या ३० रुपये किलोपासून ८० रुपयांपर्यंत मिळत आहे. लहान कलिंगड ३० तर मध्यम आकाराचे ५० रुपयांत विकले जाते.

Manganga

उन्हाळा वाढल्यामुळे कलिंगडाची मागणी जास्त आहे. अशावेळी मागणीचा फायदा घेत बाजारात केमिकल वापरून लाल केलेले कलिंगड विकले जातात. स्टेरॉईड इंजेक्शन वापरून ते लाल केले जाते.

लाल कलिंगड मिळवण्यासाठी ग्राहकांची झुंबड असते. अशा गर्दीत केमिकल वापरून लाल केलेले कलिंगड विकले जातात आणि ग्राहकांची फसवणूक होते. त्यावर अन्न व औषध प्रशासन अशा कलिंगडाचे नमुने घेऊन तपासणी करतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!