Latest Marathi News

BREAKING NEWS

महिलांना उद्योग सुरु करण्यासाठी मिळणार २० लाखांपासून ते एक कोटी रुपयांपर्यंत अनुदान

0 129

मुंबई : उद्योग क्षेत्रात महिलांच्याही उद्योगांना उभारी देऊन आर्थिक मदतीच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने २०१७ पासून महिला उद्योजकांसाठी विशेष धोरण राबविले आहे. त्यात एक कोटीपर्यंत अनुदान दिले जाते.

गेल्या सहा वर्षांत हजारो महिलांनी यासाठी अर्ज केले आहेत. त्यात गेल्या वर्षभरात ३३ महिला उद्योजकांचे अर्ज मंजूर झाले आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात ३३ अर्ज मंजूर झाले असून मुंबई शहर, जिल्ह्यात ५२ महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत. अधिकाधिक महिलांनी अर्ज करावेत.

Manganga

या माध्यमातून अर्ज करायचा असेल तर उद्योजक महिलांना जिल्हा उद्योग केंद्राकडे सरकारच्या धोरणाअंतर्गत अर्थसाहाय्य अनुदान प्राप्त करण्यासाठी अर्ज करता येतो.

महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन मिळावे म्हणून २०१७ या वर्षापासून सरकारने विशेष धोरण राबविले आहे. राज्य सरकारने सहा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या योजनेचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. या योजनेच्या माध्यमातून महिला उद्योजकांना उद्योग उभाणीसाठी २० लाखांपासून ते एक कोटी रुपयांपर्यंत अनुदान मंजूर करण्यात येते.

 

महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन मिळावे याकरिता २०१७ पासून राज्य सरकारच्या वतीने हे धोरण राबविण्यात येत आहे. या माध्यमातून दहा वर्षांत टप्प्याटप्प्याने वीस लाखांपासून ते एक कोटीपर्यंतचे अनुदान महिलांना या माध्यमातून देण्यात येते. महिलांनी या योजनेचा नक्की फायदा करून घेण्याचे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!