Latest Marathi News

BREAKING NEWS

VIDEO : भाजपा आमदाराचं अश्लील कृत्य : भरसभागृहात मोबाइलवर पॉर्न व्हिडीओ पाहण्यात मग्न : व्हिडीओ होतोय व्हायरल

0 1,385

VIDEO : भारतीय जनता पार्टीच्या एका आमदाराने सभागृहातच पॉर्न व्हिडीओ पाहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित आमदाराच्या पाठीमागे बसलेल्या अन्य एका आमदाराने हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे. विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना हा आमदार पोर्न व्हिडिओ पाहण्यात मग्न आहे.

हे ही वाचा :- बाजार समितीसाठी जात वैधता प्रमाणपत्र नाही, तरी ही तुम्ही अर्ज भरू शकणार : शासनाचा आदेश आला

Manganga

याबाबत ‘एनडीटीव्ही’ वृत्त दिले आहे. पोर्न पाहण्याऱ्या आमदाराचं नाव जादब लाल नाथ आहे. जादब लाल नाथ हे त्रिपुरातील बागबासा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. घटनेच्या दिवशी त्रिपुरा विधानसभेत राज्याच्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होती, यावेळी आमदार जादब लाल नाथ हे आपल्या फोनवर पॉर्न पाहताना आढळले आहेत.

हे ही वाचा :- “या” कारचा बाजारात धुमाकूळ : खरेदीसाठी ग्राहक रांगेत : Swift, Wagon R, Alto ‘या’ गाडी पुढे फेल

आमदार नाथ हे आपल्या फोनवर काही व्हिडीओ पाहत असताना, त्यांच्या मोबाईल मध्ये पॉर्न व्हिडीओ सुरू झाला. यानंतर आमदार नाथ यांनी संबंधित व्हिडीओ पाहिला. यावेळी काही आमदार आणि विधानसभा अध्यक्ष राज्याच्या अर्थसंकल्पावर चर्चा करत होते. हा संपूर्ण प्रकार सभागृहात अन्य एका आमदाराने रेकॉर्ड केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!