रामनवमीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत गोंधळ निर्माण झाल्यानंतर काही समाजकंठकांनी वाहनं जाळली आहेत. सदरची घटना हि पश्चिम बंगालमधील हावडा घडली असल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रामनवमी सण शांततेत साजरा करण्याचे आणि मिरवणूक काढताना कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहन केलं होते. असं असूनही पश्चिम बंगालमधील हावडा येथे हिंसाचाराची घटना घडली आहे. रामनवमीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत गोंधळ झाला आहे. यामध्ये काही समाजकंठकांनी जाळपोळ करत वाहनांना आग लावली आहे.
याबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘एएनआय’ला प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये ममता बनर्जी म्हणल्या, “रामनवमीची मिरवणूक काढणाऱ्यांना माझी विनंती आहे की, ती मिरवणूक कृपया शांततेत काढा. सध्या रमजान सुरू असल्याने मुस्लीम भागातून मिरवणूक काढणं टाळा. रामनवमी शांततेने साजरी करा, हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न करू नका. चिथावणी देऊ नका. काही भाजपा नेते म्हणत आहेत की, ते रामनवमीच्या मिरवणुकीत तलवारी आणि चाकू घेऊन फिरतील. पण हा फौजदारी गुन्हा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

रामनवमी सणाला गालबोट, अनेक वाहनं आगीच्या भक्ष्यस्थानी : VIDEO पाहण्यासाठी क्लिक करा