माणदेश एक्सप्रेस न्यूज : दि. ३० मार्च २०२३ : आटपाडी : राज्यातील मुदत संपलेल्या बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम सुरु झाला आहे. त्यामुळे आटपाडी बाजार समितीचा साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे. दिनांक २९ पर्यंत २१ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. परंतु आता राखीव मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरण्याऱ्या उमेदवारांना शासनाने मोठा दिलासा आहे.
आटपाडी बाजार समितीसाठी राखीव मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना जात वैधता प्रमाणपत्र सुरुवातीला बंधनकारक होते. परंतु नवीन शासन आदेशानुसार राखीव मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक असणार नाही.
परंतु उमेदवाराने राखीव मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवाराकडे स्वत:चे जातीचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक असून जर तो बाजार समितीवर निवडणून आला तर, बारा महिन्याच्या आत त्याने जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.

जात वैधता प्रमाणपत्र बाबत शासन आदेश पाहण्यासाठी क्लिक करा.