कृषी सवलत योजनेचा उद्या शेवटचा दिवस असून शेतकऱ्यांनी उद्या दिनांक ३१ पर्यंत वीज बील भरले तर बिलामध्ये ३० टक्के सवलत मिळणार आहे. परंतु सदर योजनेची मुदत वाढवण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
महावितरणकडून सातत्यानं शेतकऱ्यांना कृषी पंपाचे वीज बिल (Electricity Bill) भरण्याचे आवाहन केले जात आहे. यासाठी महावितरणकडून वीज बिलात सवलत देण्यात येत आहे. 31 मार्चपर्यंत जर शेतकऱ्यांनी कृषी पंपाचे बिल भरले तर शेतकऱ्यांना महावितरणकडून 30 टक्के सवलत देण्यात येत आहे. ही मुदत शेतकऱ्यांना केवळ 31 मार्चपर्यंत मिळणार आहे. म्हणजे आजचा आणि उद्याचा दिवसच या मुदतीचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे वीज बिल थकीत आहे, त्या शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी 30 टक्क्यांची सवलत दिली आहे. त्यामुळं कृषी पंपधारकांनी आपल्या कृषी पंपाची देयके वेळेत भरुन योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे. कृषी धोरण-2020 योजनेनुसार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज आणि विलंब आकारात माफी, तर सुधारित थकबाकीतही 30 टक्के सूट देण्यात आली आहे.
कृषीपंप शेतकऱ्यांसाठी महावितरणच्या वतीनं कृषी धोरण 2020 राबवण्यात येत आहे. मागीलवर्षी ही योजना सुरु झाली होती. तीन वर्षांसाठी राबवण्यात येत असलेल्या या धोरणाचे दुसरे वर्ष आहे. दुसऱ्या वर्षाची मुदत येत्या 31 मार्चला म्हणजे उद्या संपणार आहे.