पुणे येथील ससून रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अदिती दलभंजन या 20 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली. नैराश्यात असल्याने तीने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
हे ही वाचा :- आटपाडी : पोलीस ठाणेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन : नवीन इमारत होणार दुमजली

पुणे येथील सिंहगडरोड आनंदनगर येथे ती राहण्यास होती. बुधवारी सकाळी तिच्या वडिलांनी तिला कॉलेजमध्ये सोडले होते, मात्र अदितीने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सध्या पोलीस तपास करत आहेत.
हे ही वाचा :- आटपाडी बाजार समितीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अदिती परीक्षेच्या निकालामुळे घाबरली होती. तिने तिच्या समस्या तिच्या मित्र आणि वडिलांना सांगितल्या होत्या. बुधवारी तिने तिची बॅग वर्गात ठेवली आणि प्रात्यक्षिक परीक्षेला बसली नाही. त्याऐवजी तिने ससून रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तिने आत्महत्या करताना तिचा मोबाईल टेरेसवरच ठेवला होता. याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आला असून, पुढील तपास बंडगार्डन पोलिस करत आहे. (स्त्रोत ABP माझा)