प्रत्येक भारतीयांचे स्वप्न असते की, आपल्या घरापुढे एखादी चारचाकी गाडी असावी. त्यामुळे महागाईच्या जमान्यात मध्यमवर्गीय भारतीय हे खिशाला परवडणारी गाडी घेत असतात. या अगोदर भारतीय कार बाजारामध्ये मारुती-सुझुकीच्या Swift, Wagon R, Alto या गाड्यांचा बोलबाला आहे. परंतु आता मात्र भारतीय बाजारपेठेमध्ये Swift, Wagon R, Alto गाड्यांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. पाहूया कोणत्या गाडीने भारतीय बाजार पेठ काबीज केली आहे.

कार बाजारात मारुती सुझुकीचे वर्चस्व कायम आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप-४ गाड्या मारुती सुझुकीच्या आहेत. मारुती सुझुकी बलेनो या कारची फेब्रुवारी २०२३ मध्ये सर्वाधिक विक्री झाली आहे. या कारने अल्टो, वॅगनआर आणि स्विफ्टलाही मागे टाकले आहे.
फेब्रुवारी महिन्यातील बेस्ट सेलिंग कार पाहण्यासाठी क्लिक करा