Latest Marathi News

BREAKING NEWS

आटपाडी : पोलीस ठाणेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन : नवीन इमारत होणार दुमजली

0 1,992

माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी पोलीस ठाणेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन डीवायएसपी पद्मा कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी आटपाडी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, पोलीस उप निरीक्षक अजित पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

हे ही वाचा :-  Red Bull, Sting पिताय, मग हे माहिती असू द्या, त्या मध्ये किती कॅफिन असते…..

 

Manganga

आटपाडी पोलीस ठाणेची सध्या असणारी इमारत अपुरी पडत होती. या ठिकाणी सिनिअर पोलीस निरीक्षक सोडले तर सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक यांना आहे त्या इमारती मध्ये कामकाज करावे लागत आहे. परंतु आता नवीन इमारती मध्ये सिनिअर पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक यांच्यासह पासपोर्ट विभाग, वायरलेस विभाग, पुरुष कैदी, महिला कैदी स्वतंत्र जेल, ठाणे अंमलदार कक्ष, वेटिंग रूम अशा सुविधा असणार आहे.

हे ही वाचा :- प्रक्षोभक भाषण : हिंदू राष्ट्र सेनेच्या संस्थापकांविरुद्ध गुन्हा दाखल

 

तसेच नवीन पोलीस स्टेशनचे दोन मजली बांधकाम हे महाराष्ट्र स्टेट पोलीस हाऊसिंग अँड वेल्फेअर कार्पोरेशन लिमिटेड मुंबई यांच्या अखत्यारीत 4.66 कोटी चे 12000 स्क्वेअर फुटचे असणार असून सदरचे बांधकाम एक वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यावेळी भूमिपूजन कार्यक्रमास आटपाडी पोलीस ठाणेचे सर्व पोलीस कमर्चारी, त्यांचे कुटुंब यांच्यासह माजी सैनिक, मान्यवर उपस्थित होते. आटपाडी पोलीस ठाणेच्या नवीन इमारतीमुळे आटपाडी तालुक्याच्या वैभवात भर पडणार आहे.

हे ही वाचा :-  नवरा बायकोने भररस्त्यात सोडली मर्यादा ! Video होतोय व्हायरल

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!