सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकरी व्हिडीओमधील शिक्षिकेचं मनापासून कौतक करत आहेत. बॉलिवूडच्या गाण्यांची आवड आणि त्या गाण्यांवर डान्स करण्याचा मोह भल्याभल्यांना आवरता येत नाही. अनेक पार्ट्या, लग्नसमारंभ आणि शालेय कार्यक्रमांमध्ये लोक हिंदी गाण्यांवर जोरदार डान्स करताना दिसतात.
हे ही वाचा :- सांगली : बेदाणा वॉशींग व रिपॅकींग सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

अशा परिस्थितीत एखाद्या शिक्षकाला नाचायला सांगितले तर ते तरी कसा नकार देतील? सध्या अशाच एका महिला शिक्षिकेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे., ज्यामध्ये ती बॉलिवूड चित्रपट “हम” या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. महिला शिक्षिकेचा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या ‘हम…’ या चित्रपटातील ‘चुम्मा चुम्मा दे दे’ या प्रसिद्ध गाण्यावर स्टेजवर भन्नाट डान्स करताना दिसत आहेत.
हे ही वाचा :- गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका, म्हणाले….
ही शिक्षिका आपल्या डान्सने सगळ्यांची मन जिंकताना दिसत आहे. अनेकांना या शिक्षिकेचा डान्स आवडला असून लोक तो मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. व्हिडिओमधील शिक्षिकाच्या डान्सच्या स्टेप्स पाहून समोर उपस्थित सर्व विद्यार्थी खूप खुश झाले आहेत, कारण ते जोरात टाळ्या वाजवत शिक्षिकेच्या डान्सला दाद देत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ एका शाळेतील माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यातील असल्याचे दिसत आहे.
Video : महिला शिक्षिकेचा भन्नाट डान्स पाहण्यासाठी क्लिक करा