पवार नावाची किड या महाराष्ट्राला लागली आहे. ती मुळापासूनच काढून टाकावी लागावी लागेल. तरच तुम्हाला न्याय मिळेल, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची इंदापूरमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र डागले.
हे ही वाचा :- आटपाडी बाजार समितीसाठी मोर्चे बांधणी सुरु : देशमुख-पडळकर गटाची बैठक संपन्न

यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर 2014 ते 2019 या काळामध्ये त्यांनी मराठवाडा, कोकण, खानदेश, विदर्भ येथील शेतकऱ्यांचा विचार करुन शेतकऱ्यांसाठी योग्य ते निर्णय घेतले. मी दुष्काळी तालुक्यातून येतो. तो मतदारसंघ पवारांच्या पाठीशी ठामपमे उभा राहिला. मात्र या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी द्यावे वाटले नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रश्न स्वतःला विचारावा.
हे ही वाचा :- व्हिडीओ : इंदुरीकरांनी घेतला गौतमी पाटीलचा समाचार म्हणाले, ‘तीन गाणी वाजवून तिला 3 लाख अन् आम्ही…
राज्यात आणि देशात अनेक वर्षे यांच्याकडे सत्ता होती. मात्र यांना पाणी देता आले नाही. हे चार वेळा मुख्यमंत्री झाले. यांना का नाही वाटले दुष्काळी भागात पाणी द्यावे? हे केंद्रीय कृषी मंत्री होते. यांना राज्यात पैसा आणावासा वाटला नाही, असा सवाल त्यांनी विचारत, यांच्यापाठीमागून मायावती, जयललिता, केजरीवाल मुख्यमंत्री झाले. यांना 100 च्या पुढे आकडा नेता येत नाही. त्यामुळे येथून पुढे पुणे जिल्ह्याने राष्ट्रवादीला कायमचे हद्दपार करायचे ठरवले असल्याचे ते म्हणाले. गोपीचंद पडळकर यांच्या या जहरी टीकेमुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :- कमी किंमत असणारी महिंद्रा बोलेरो फेसलिफ्ट : Ertiga पेक्षा कमी किंमत