माणदेश एक्स्प्रेस न्यूज : दि. २७ मार्च २०२३ : आटपाडी : आटपाडी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी तालुक्यातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवावादी काँग्रेस यांनी मोर्चे बांधणी सुरु केली असून या निवडणुकीसाठी देशमुख-पडळकर गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न माजी आम. राजेंद्रआण्णा देशमुख यांच्या उपस्थित संपन्न झाली.
सध्या बाजार समितीवर प्रशासक असले तरी माजी आम. राजेंद्रआण्णा देशमुख गटाची एकहाती सत्ता होती. परंतु राजकारणात बरीच उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारे राजेंद्रआण्णा देशमुख यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. तर भाजपचेच गोपीचंद पडळकर हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. त्यामुळे यावेळची निवडणूक ही पडळकर-देशमुख गट एकत्रित निवडणूक लढवणार आहेत.
हे ही वाचा : व्हिडीओ : इंदुरीकरांनी घेतला गौतमी पाटीलचा समाचार म्हणाले, ‘तीन गाणी वाजवून तिला 3 लाख अन् आम्ही…
शिवसेनेकडून सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांचा गट निवडणूक लढविणार असल्याने त्यांच्या ही गटाची अंर्तगत मोर्चे बांधणी सुरु आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी ही निवडणुकीसाठी तयारी केली असून तालुक्यातील समविचारी पक्षांना व लोकांना विचारात घेवून निवडणूक लढविणार असल्याने त्यांनी जाहीर केले असून भाजप व सेनेबरोबर युती करणार नाही जाहीर केले आहे.
हे ही वाचा : आटपाडी : विठलापूरच्या युवकाची मुंबईत आत्महत्या
त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सध्या तरी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याची घोषणा केली असली तरी अर्ज भरण्यापासून ते अर्ज माघारी घेतलेनंतरच सगळ्यांची भुमिका स्पष्ट होणार आहे.
हे ही वाचा : कमी किंमत असणारी महिंद्रा बोलेरो फेसलिफ्ट : Ertiga पेक्षा कमी किंमत
