माणदेश एक्सप्रेस न्युज : दि २६ मार्च २०२३ : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील घरनिकी येथील बिअरबार वर चोरट्यांनी डल्ला मारला असून बिअरबार फोडून दारू,बिअरच्या बाटल्या केल्या लंपास केल्याची घटना घेतली.
याबाबत अधिक माहिती अशी, घरनिकी येथे महेश पवार यांचे रॉयल बिअरबार व परमिट रूम आहे. दिनांक २५ च्या रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बिअर बारच्या पाठी मागील बाजूस असलेल्या खिडकीतून आत मध्ये प्रवेश करून बार मधील दारूच्या बाटल्या व बिअर बारच्या बाटल्या चोरट्यांनी लंपास केला आहे.
याबाबत आटपाडी पोलिसात अज्ञात चोरट्या विरुद्ध महेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोहेकॉ गावडे करीत आहेत.