Indurikar Maharaj Vs Gautami Patil : लावणी किंग गौतमी पाटीलची सध्या राज्यामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. तिचा कार्यक्रम व राडा हे आता समीकरणच बनले आहे. गौतमीचे सोशल मीडियावर लाखोंच्या घरात फॉलोअर्स असून तिचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. गौतमीच्या मादक व अश्लील हावभावाने तरुण पिढीला भूरळ पडली असतली तरी टी अश्लील हावभाव केल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. यातच आता प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar maharaj) यांनी गौतमी पाटीलचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला आहे.
कीर्तनाच्या कार्यक्रमात इंदुरीकर महाराजांनी गौतमी पाटीलवर खास शैलीत टीका करत म्हणाले, गौतमी पाटलीच्या तीन गाण्याला ३ लाख रुपये देण्याची तयारी असते. मात्र आम्हाला टाळ वाजवूनही काही मिळत नाही.आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला, असा आरोप होतो. मात्र गौतमीने तीन गाण्यावर नाचले की, तीन लाख रुपये मोजतात.

तिच्या कार्यक्रमात मारामारी, राडा तर तर काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधे संरक्षणही दिले जात नाही, या शब्दांत इंदुरीकर महाराजांनी खंत व्यक्त करत समाजाच्या बदलत्या मानसिकतेवर शरसंधान साधले आहे. यापूर्वी लावणी समाज्ञी सुरेखा पुणेकर (surekha punekar) यांनीही गौतमीवर टीका केली होती.