माणदेश एक्सप्रेस न्युज : दि २६ मार्च २०२३ : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील विठलापूर येथील युवकाने मुंबई येथे राहत्या खोलीत आत्महत्या केली.
याबाबत अधिक माहिती अशी, विठलापूर येथील युवक पंकज भारत बाड (वय २४) हा विठलापूर येथे राहण्यास होता. गावामध्ये कामधंदा नसल्याने तो मुंबई येथे कामाच्या निमित्ताने गेला होता. या ठिकाणी तो कंपनीत कामाला होता. २५ मार्च च्या रात्री त्याने राहत्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली.

आत्महत्येचे कारण समजले नाही. मुंबईवरून त्याचा मृतदेह विठलापूर येथे आणण्यात आला असून या ठिकाणी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. पंकजने केलेले आत्महत्येमुळे परीसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
हे ही वाचा
-
कमी किंमत असणारी महिंद्रा बोलेरो फेसलिफ्ट : Ertiga पेक्षा कमी किंमत
-
IPL 2023 : पंजाबला मोठा धक्का : ‘हा’ प्रमुख खेळाडू IPL 2023 मधून