महिंद्रा & महिंद्रा कंपनी निर्मित महिंद्रा बोलेरो BS6 या गाडी विषयी सविस्तर माहिती पाहूया
इंजिन-
BS6 महिंद्रा बोलेरो फेसलिफ्ट, BS6-अनुरूप 1.5-लीटर mHawk75 डिझेल इंजिनद्वारे समर्थित असेल जे 3,600rpm वर 75bhp आणि 1,600- 2,200rpm वर 210Nm टॉर्क निर्माण करत असते. व तसेच हे इंजिन पाच-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह जोडले गेलेलं आहे.

सुविधा
महिंद्रा बोलेरो फेसलिफ्टच्या BS6 – या मध्ये बाह्य भाग नवीन बंपर, नवीन लोखंडी जाळी, नवीन हेडलॅम्प, मागील वॉशर, वायपर्स आणि फॉग लॅम्प हे सर्व कंपनी कडून पुन्हा डिझाइन केले गेले आहेत. व तसेच आत मध्ये ड्रायव्हर माहिती प्रणाली, श्रेणी माहिती, गियर इंडिकेटर, दरवाजा अर्धा उघडा असेल तर संकेत आणि दिवस आणि तारखेसह डिजिटल घड्याळ येवढया सुविधा कंपनी कडून provide करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय फॅब्रिक सीट्स, पॉवर विंडो, सेंट्रल लॉकिंग, कीलेस एंट्री आणि 12V चार्जिंग पॉइंट यांसारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. mahindra bolero
BS4 पेक्षा अतिरिक्त सुविधा-
रिमोट सेंट्रल लॉकिंग 112v पॉवर आउटलेट, फॅब्रिक सीट, समोर आणि मागे पॉवर विंडोज, इंटिग्रेटेड म्युझिक सिस्टम, 4 स्पीकर्स, ऑडिओ स्ट्रीमिंग ब्लूटूथ, या जास्तीच्या सुविधा कंपनी कडून देण्यात आलेल्या आहेत.
किंमत
ह्या गाडीची कमीत कमी किंमत ही 9.53 लाख आहे तर जास्तीत जास्त किंमत 10.48 लाख एवढी आहे. महिंद्रा बोलेरो ही 7 सीटर कॉम्पॅक्टएसयूव्ही आहे.महिंद्राने भारतात आपली BS6-अनुरूप बोलेरो फेसलिफ्ट लॉन्च केलेली आहे.
जिची किंमत 9.47 लाख रुपये (एक्स-शोरूम, मुंबई) पासून सुरू आहेत. व तसेच हे मॉडेल आपल्याला बाजारात तीन प्रकारात उपलब्ध आहे B4, B6 आणि B6 (O)
(अधिक माहितीआठी जवळच्या महिंद्रा कंपनीच्या शोरूमला भेट द्या )