सांगली : मिरज तालुक्यातील बेडग येथील नागरगोजेवाडीत पोहायला तलावात गेलेल्या दोन अयाज युनुस सनदी (वय ९) व अफान युनुस सनदी (वय ७) या बालकांचा तलावात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, बेडग येथे युनूस नसरुद्दीन सनदी आपल्या कुटुंबियासोबत राहतात. त्यांची अयाज व अफान ही मुले शाळेतून घरी आल्यानंतर मासे पकडण्यासाठी सार्वजनिक पाझर तलावात गेले होते. यावेळी दोघेही पोहण्यासाठी तलावात उतरले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाले.

यावेळी मुलांनी आवाज एकूण शाहिद मुजावर याने दोघांना तलावातून बाहेर काढले. मात्र, अयाज व अफान यांचा बुडाल्याने मृत्यू झाला. या घटनेने नागरगोजेवाडी येथे शोककळा पसरली होती.
हे ही वाचा