Latest Marathi News

BREAKING NEWS

IPL 2023 : पंजाबला मोठा धक्का : ‘हा’ प्रमुख खेळाडू IPL 2023 मधून बाहेर

0 445

IPL 2023 : ३१ मार्च पासून इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धे सुरु होत आहे. अशात स्पर्धेपूर्वीच अनेक संघांचे खेळाडू दुखापतग्रस्त होऊन स्पर्धेबाहेर पडत आहेत. यामध्ये पंजाब किंग्स संघाचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो याचा समावेश झाला आहे. बेअरस्टो दुखापतीमुळे आयपीएल 2023 स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी, पंजाबने बदली खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाचा अनकॅप्ड (राष्ट्रीय संघाकडून न खेळलेला खेळाडू) खेळाडू मॅथ्यू शॉर्ट याला ताफ्यात सामील केले आहे.

याबाबतची माहिती पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याची माहिती दिली आहे. पंजाबने ट्वीट शेअर करत जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) याच्या जागी मॅथ्यू शॉर्ट (Matthew Short) याला संघात घेतले आहे.

Manganga

ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “आम्हाला हे सांगताना खेद होत आहे की, जॉनी बेअरस्टो त्याच्या दुखापतीमुळे या आयपीएल हंगामाचा भाग बनू शकणार नाही. आम्ही त्याला शुभेच्छा देतो आणि पुढील हंगामासाठी त्याला खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहोत. त्याच्या जागी मॅथ्यू शॉर्ट याचे स्वागत आहे.”

जॉनी बेअरस्टो हा आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे पंजाब किंग्स संघाला मोठा झटका बसला तरी, आयपीएल 2023 मध्ये स्फोटक फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन संपूर्ण हंगामात उपलब्ध राहणार असल्याने त्याचा मोठा फायदा पंजाब ला होणार आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!