केंद्र सरकारविरोधात आक्रमकपणे भूमिका मांडणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने शिक्षा केल्यानंतर यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला ज्यामुळे देशाच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. या निर्णयानंतर मोदी सरकारविरोधात सर्वच विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलने सुरु केली आहेत.
परंतु राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईचा मात्र मंजी मंत्री आम. बच्चू कडू यांना त्रास सहन करावा लागत आहे. कारण सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना नाशिकमधील सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे, त्यामुळे त्यांची आमदारकी कधी रद्द होणार? असा सवाल राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे. पुण्यात राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी करण्यात आली आली असून, ‘नियम सर्वाना सारखेच असले पहिजेत’ म्हणत, निणर्य वेगवान, महाराष्ट्र गतिमान! म्हणत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर उपहासात्मक टीका देखील केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस कडून करण्यात आलेल्या बॅनरबाजीवर बच्चू कडू काय म्हणाले पाहण्यासाठी क्लिक करा