सोलापूर : घरगुती काम करण्यासाठी भाड्याने लावलेल्या रिक्षाच्या चालकाने महिलेला ज्युसमध्ये गुंगीचे औषध घालून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली. याप्रकरणी सुनील उर्फ सोमनाथ धर्मराज आचलारे ( वय ३५, रा. हत्तुरे वस्ती) याच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित महिलेला आरोपी सुनील आचलारे हा नेहमी आपल्या रिक्षातून नेत आणत होता. यातूनच त्यांची ओळख झाली होती. एके दिवशी आरोपीने पीडितेला ज्यूसच्या बॉटलमध्ये गुंगीचे औषध देत तिला लॉजवर नेऊन अत्याचार केला. शिवाय संबंध ठेवत्यावेळीचे फोटो काढत ब्लॅकमेलिंग करू लागला.

त्यानंतर पीडितेला विविध ठिकाणी जाऊन अत्याचार केला. शिवाय आतापर्यंत त्याने एक लाख रुपये विविध प्रकारे घेतले आहेत, अशा आशयाची फिर्याद पीडितेने दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपी आचलारे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.