Latest Marathi News

BREAKING NEWS

आश्चर्यचकित ! गुढीपाडव्याला चक्क बोकडाचे नामकरण

0 66

बीड : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर लहान बाळांचे नामकरण हे सर्वश्रुत आहे. परंतु, माजलगाव तालुक्यातील चोपनवाडीच्या शेतकऱ्याने चक्क लाडक्या बोकडाचे नामकरण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर केले. या आगळ्यावेगळ्या सोहळ्याने बीड जिल्ह्यात आता ‘चेतक’ हा बोकड चर्चेत आहे.

माजलगाव तालुक्यातील चोपनवाडी येथील विठ्ठल डीसले या शेतकऱ्याने जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय जोपासला आहे. यातच त्यांनी नऊ महिन्याचा बिटल जातीचा बोकड तब्बल सत्तर हजार रुपयांत खरेदी केला. दरम्यान, या लाडक्या बोकडाचे नामकरण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्याचा डीसले यांनी ठरवले. बुधवारी (दि.२२) सकाळी गुढी उभारून डिसले यांनी स्वतःच्या शेतात बोकडाचा नामकरण सोहळ्याची जय्यत तयारी केली.

Manganga

यावेळी बोकडाच्या गळ्यात पुष्पहार, पितळाची जाड साखळी, समोरच्या दोन्ही पायात पितळाचे तोडे, शरीराला चार-पाच ठिकाणी फित बांधून त्याला सजवण्यात आले. त्यानंतर महिलांनी गंध, गुलाल वाहून बोकडाचे औक्षण केले. त्यानंतर लाडक्या बोकडाचे ‘चेतक’ असे नामकरण झाल्याचे जाहीर करण्यात आले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!