आटपाडी : विवाहतेचा शारीरिक व मानसिक छळ : नवरा, सासू, सासरा यांच्या विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल
माणदेश एक्सप्रेस न्युज : विवाहतेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी नवरा, सासू, सासरा यांच्या विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मुळची करगणी येथील असलेली फिर्यादी हिचा विवाह नाटुली ता. इस्लामपूर, जि. सांगली येथील कृष्णा बापू माने याच्या बरोबर झाला आहे. लग्नानंतर फिर्यादी नवरा कृष्णा बापू माने याने संशय घेत, लाथाबुक्यांनी मारहाण करत तू मला शोभत नाही म्हणून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला.

तसेच मोबाईलवर वरती तिच्या नावाची बदनामी केली असून सासरा बापू शिवाजी माने व सासू विमल बापू माने यांनी फिर्यादीस शिवागाळी करून तिला अपमानास्पद वागणूक दिल्याने फिर्यादीने मुंग्या मारण्याचा खडू खाल्ला होता. याप्रकरणी सदर घटनेचा अधिक तपास पोहेकॉ मिसाळ करत आहेत.