Latest Marathi News

BREAKING NEWS

लक्झरीचे चाक डोक्यावरून गेल्याने आटपाडी तालुक्यातील तरुणाचा मृत्यू

0 3,748

म्हसवड : म्हसवड विरकरवाडी रोडवर जामदार वाडा परिसरातील महादेव मंदिरासमोर दिघंची शेजारील महाडीकवाडी येथील सत्यवान मधुकर महाडीक व पृथ्वीराज सत्यवान महाडीक (वय १८) हे बापलेक म्हसवड येथील एका दुकानातून पाडव्याच्या मुहूर्तावर घरगुती पिठाची गिरणी मोटारसायकलींवर घेऊन म्हसवड वरुन महाडीकवाडी येथे आपल्या घरी निघाले असताना मोटारसायकल व लक्झरी यांची धडक बसल्याने मोटारसायकलींच्या मागे गिरणी घेऊन बसलेल्या पृथ्वीराज याच्या डोक्यावरून चाक गेल्याने पृथ्वीराज यांच्या डोक्याच्या चिंधड्या झाल्याची घटना मंगळवारी रात्री आठच्या दरम्यान घडली.

या अपघातात जखमी झालेल्या रुपेश रघुनाथ लुबाळ वय 34 वर्ष रा. शिरगाव ता. माण जिल्हा सातारा यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात सत्यवान मधुकर महाडिक रा.महाडिकवाडी लिंगीवरे ता. आटपाडी जिल्हा सांगली यांचे विरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Manganga

याबाबत अधिक माहिती अशी, रुपेश लुबाळ हे दिनांक २१ रोजी सायंकाळी 7.00 वा. चे सुमारास मौजे विरकरवाडी ता.माण गावच्या हद्दीत अस्मिता नगर येथे मी साईटला गाडी लावून फोनवर बोलत होते. यावेळी सत्यवान मधुकर महाडिक रा.महाडिकवाडी लिंगीवरे ता.आटपाडी हा एचएफ डीलक्स मोटरसायकल नंबर MH 10 DX 2475 वरून जात असताना त्याने रुपेश लुबाळ यांच्या गाडीला धडक दिल्याने ते रस्त्याच्या खाली पडल्याने जखमी झाले.

 

तर त्याचवेळी समोरून येणाऱ्या माणदेश ट्रॅव्हल्सला त्यांची गाडी धडकली त्यामध्ये ते सत्यवान महाडिक हे जखमी झाले तर त्यांचा मुलगा पृथ्वीराज महाडिक याचा या अपघातामध्ये मृत्यू झाला. याबबत म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून सपोनि राजकुमार भूजबळ यांचे मार्गदर्शनाखाली पो हवलदार जाधव अधिक तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!