CIBIL स्कोअरबद्दल तक्रार कुठे करायची हे जाणून घ्या
CIBIL स्कोअरबद्दल काही समस्या असल्यास, तो cibil च्या https://www.cibil.com/dispute या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘Contact Us विभाग ओपन करून फॉर्म भरू शकतो. याशिवाय CIBIL शी संबंधित तक्रार कंपनीला हेल्पलाइन क्रमांक च्या मदतीने देखील कळवू शकणार आहे. या तक्रारीसाठी हा 22-61404300 ग्राहक हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे.

22-61404300 या क्रमांकावर सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संपर्क साधता येतो. म्हणजेच कार्यालयीन वेळेतच ग्राहकाला आपली तक्रार या ठिकाणी नोंदविता येणार आहे. याशिवाय आपली तक्रार संबंधित व्यक्ती ई-मेलच्या माध्यमातून पोहोचवू शकणार आहेत. यासाठी info-cibil.com या ईमेलवर ग्राहकाला आपली तक्रार नोंदवावी लागणार आहे.