कर्ज घेताना वित्तीय संस्थाकडून सगळ्यात प्रथम एका गोष्टीची विचारणा होते आणि या गोष्टीवरच त्या संबंधित व्यक्तीला कर्ज मिळेल की नाही याचा निर्णय हा बँकेचा सक्षम अधिकारी घेत असतो. आता प्रश्न असा उपस्थित होतो की ही गोष्ट कोणती? तर ही गोष्ट आहे सिबिलची. ज्या व्यक्तीचा सिबिल खराब असतो त्याला बँकांकडून कर्ज देण्यास टाळाटाळ केली जाते.
बऱ्याच वेळा ज्या व्यक्तीच सिबिल हे खराब असतं त्या व्यक्तीचे उत्पन्नाचे स्रोत चांगले असतानाही अनेकदा बँकेच्या अधिकाऱ्याकडून कर्जा संदर्भात वेगवेगळ्या निकषांची कसून पूर्तता करून घेतली जाते, अन मग एक तर कर्ज नाकारतो किंवा कमी कर्ज मंजूर होते.

त्यामुळे सिबिल स्कोर चुकून कमी झाला असेल, किंवा वित्तीय संस्थांनी दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे तुमचे क्रेडिट रेटिंग खराब झाले असेल तर मग काय करायच? कुठे तक्रार करायची, तुमची क्रेडिट हिस्ट्री खराब झाली आहे की नाही हे सिबिल स्कोर वरून ठरते.
बँकांच्या चुकीमुळे किंवा अन्य काही कारणामुळे कर्जाची वेळेवर परतफेड केलेली असतानाही, चालू असलेले सर्व ईएमआय किंवा हप्ते वेळेवर फेडलेले असतानाही जर सिबिल स्कोर कमी असेल तर असे व्यक्ती किंवा ग्राहक या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी CIBIL तक्रार निवारण कक्षाशी संपर्क साधू शकतात.