बायकोच्या वाढदिवसाला चक्क गौतमी पाटीलची लावणी : नवऱ्याचा नादच खुळा !
गौतमी पाटीलने अल्पावधीतच खूप प्रसिद्धी मिळवली. तिच्या लावणीच्या जाहीर कार्यक्रमांना होणारी गर्दी आणि त्यानंतर होणारी धक्काबुक्की, हाणामारी या सगळ्या बातम्या अनेकदा आल्या आहेत. बीडमधल्या एका हौशी नवऱ्याने आपल्या बायकोच्या वाढदिवसाच्या दिवशी गौतमी पाटीलचा लावणीचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमात ती आली ती नाचली आणि तिने उपस्थितांची मनं जिंकली.

बीड जिल्ह्यातील आष्टीमधल्या किरण गावडे यांनी त्यांची बायको प्रगती गावडे यांना वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून चक्क गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम ठेवला. गौतमी पाटील या कार्यक्रमाला आल्यानंतर सगळेच उपस्थित बेभान झाले होते. निमगाव बोडखा या ठिकाणी हा कार्यक्रम होता. तिथे जमलेल्या सगळ्या उपस्थितांनी गौतमीच्या तालावर ठेका धरला.
वाढदिवसानिमित्त बोलताना किरण गावडे म्हणाले की, माझी पत्नी प्रगती गावडे हिच्या वाढदिवसाला मी गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला होता. माझ्या पत्नीनेच ही मागणी केली होती. तिच्या आग्रहासाठीच हा कार्यक्रम ठेवला होता. तो यशस्वी झाला. पत्नीची इच्छा मी पूर्ण करू शकलो याचा आनंद आहे असंही किरण गावडे यांनी सांगितलं. यावेळी गौतमी पाटीलच्या हातून केक कापून प्रगती गावडे यांचा वाढदिवस साजरा झाला.