७/१२ : सातबारा काढण्यासाठी आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही : तुम्ही घरी बसून करा ७/१२ डाऊनलोड
७/१२ : सातबारा काढण्यासाठी आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही : तुम्ही घरी बसून करा ७/१२ डाऊनलोड
शेतकऱ्यांच्या साठी प्रत्येक शासकीय कामासाठी ७/१२ काढावा लागतो. परंतु तो काढण्यासाठी आपले सर्व काम बाजूला ठेवून तलाठी कार्यालयात जावे लागते. या ठिकाणी तलाठी असेलच असे काही नाही. त्यामुळे कमीत-कमी दोन-तीन हेलपाटे तर मारावेच लागतात. त्यामुळे आज आपण घरी बसून ७/१२ कसा डाऊनलोड करायचा आहे ते पाहूया.

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्यासाठी आता डिजिटल स्वाक्षरी सातबारा महाभुमी अभिलेख द्वारे सामान्य लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आणि याची वैशिष्ट्ये ची बाब म्हणजे हा उतारा आपण घरबसल्या काढू शकतो. व सरकारी कामातही हा उतारा वापरण्यास परवानगी आहे.