माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. २१ मार्च २०२३ : बीड : सुरेश वाघमारे
केज तालुक्यातील पैठण (सावळेश्वर)येथे दुर्दैवी घटना घडली असून गावातील तीन अल्पवयीन मुले शेतातील पाण्याच्या खड्ड्यात बुडून मृत्युमुखी पडली आहेत. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि.२१ मार्च रोजी पैठण (सावळेश्वर) येथे चि.स्वराज जयराम चौधरी वय (७ वर्ष), चि.पार्थ श्रीराम चौधरी(८वर्ष), चि. श्लोक गणेश चौधरी ही तीन मुले शेतातील बोअर शेजारी असंलेल्या पाणी साठविण्यासाठी केलेल्या खड्यात आंघोळी साठी गेली असता त्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे आणि त्यांचे सहकारी हे घटनास्थळी भेट देवून मुलांचे मृतदेह बाहेर काढले.