Latest Marathi News

BREAKING NEWS

व्हायरल व्हिडीओ : कंडक्टरची तिकीट काढण्यासाठी कसरत : पाहून पोट धरुन हसाल

0 2,326

सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांना आपले हसू आवरणे कठीण झालं आहे. शिवाय या व्हिडीओचा संदर्भ थेट राज्य सरकारने जाहीर केलेल्या एका निर्णयाशी आहे. तो म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष २०२३-२४ अर्थसंकल्पात एसटीच्या तिकीट दरात महिलांना ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती.

त्यानुसार ५० टक्के सवलततीची योजना लागू देखील झाली आहे. तर एवढ्या मोठ्या योजनेवर मीम करणार नाहीत ते नेटकरी कसले? त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या योजनेशी संबंदित अनेक मीम्स बनत असून ते तुफान व्हायरल होत आहेत.

Manganga

त्यातच आता एका कंडक्टरचा एसटीत तिकीट काढतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्ही थक्क तर व्हालच शिवाय हसून हसून तुमचं पोट दुखेल यात शंका नाही. या व्हिडीओमध्ये एक बस प्रवाशांनी भरलेली दिसत आहे. या बसमध्ये पाय ठेवायलाही जागा शिल्लक नसल्याचं दिसत आहे. तर बसमध्ये महिलांची संख्याही मोठ्या प्रमाणात दिसत आहे.

 

यावेळी बसमधील कंडक्टरला तिकीट काढण्यासाठीही पुढे मागे जाता येत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे शेवटी कंडक्टर बसमधील सीटवरुन उड्या मारत जातो. हा व्हिडीओ पोस्ट करताना, महिलांना अजून सवलती द्या, असं मजेशीर कॅप्शन दिलं आहे. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकजण त्यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. परंतु सदरचा व्हिडीओ कुठला आहे मात्र नक्की माहित नाहीये.

 

व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!