आटपाडी : दिघंची गायरान जमिनींचा मुद्दा विधानसभेत : जयंत पाटील यांनी केली चौकशी मागणी
माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. २० मार्च २०२३ : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील गायरान जमिनीचा मुद्दा आज विधानसभेमध्ये उपस्थित झाला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आम. जयंत पाटील यांनी याबाबत सभापतीकडे याविषयी मुद्दा उपस्थित करत एका महिन्यात यावर कार्यवाही करण्याची मागणी केली.
