माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. २० मार्च २०२३ : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील गायरान जमिनीचा मुद्दा आज विधानसभेमध्ये उपस्थित झाला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आम. जयंत पाटील यांनी याबाबत सभापतीकडे याविषयी मुद्दा उपस्थित करत एका महिन्यात यावर कार्यवाही करण्याची मागणी केली.
यावेळी जयंत पाटील म्हणाले, दिघंची येथे हायवेलगत महाराष्ट्र शासनाची ४० एकर जमीन आहे. सदर जमिनीची किंमत ही करोडो रुपयांची आहे. परंतु दिघंची ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व अधिकारी यांनी जमिनीचे प्लॉट पाडून विक्री सुरु केली आहे. सन २०१९ ते २०२२ अखेर या ठिकाणी शासनाच्या वतीने रोजगार हमी योजनेमधून बिहार वृक्ष लागवड त्या ठिकाणी करण्यात आली होती.

परंतु अधिकारी व पदाधिकारी यांनी त्या ठिकाणी लावण्यात आलेली झाडे पाडून प्लॉट ची विक्री केली आहे. २९ जून २०२० रोजी प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्यांनी ही काही कार्यवाही केली नाही. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यास कारणे दाखवा नोटीस काढण्यात आली असल्याची माहिती दिली असून ग्रामसेवक आता पोलिसांना संरक्षण मागणी करत असून त्या ठिकाणी अतिक्रमण काढणार असल्याचे सांगत असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
दिघंची गायरान जमिनीबाबत विधानसभेत जयंत पाटील आक्रमक : काय म्हणाले जयंत पाटील पाहण्यासाठी क्लिक करा