Latest Marathi News

BREAKING NEWS

विजय ताड खून प्रकरण : भाजपचाच माजी नगरसेवक निघाला खुनाचा मुख्य सूत्रधार ; विजय ताड यांच्या हत्येचा उलगडा

0 2,343

माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. २० मार्च २०२३ : जत : जतमधील माजी भाजप नगरसेवक विजय ताड यांच्या हत्येचा उलघडा झाला असून भाजपचाच माजी नगरसेवक उमेश सावंत यानेच हत्या घडवून आणल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. जतमधील भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खून प्रकरणी पाच जणांची नावे निष्पन्न झाली आहेत.

 

यामध्ये चार जणांना अटक करण्यात आली आहे. या खुनाचा मुख्य सूत्रधार भाजपचाच माजी नगरसेवक उमेश सावंत असल्याचे समोर आले आहे. मात्र, हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला? ते स्पष्ट झाले नसल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली असून उमेश सावंत फरार आहे.

Manganga

 

जतमध्ये 17 मार्च रोजी भरदिवसा भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांची गोळ्या झाडून आणि डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती. विजय ताड हे दुपारच्या सुमारास आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघाले असता सांगोला रोडवरील अल्फान्सो स्कूलजवळ हल्लेखोरांनी गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला चढवला होता. यावेळी पळून जात असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर त्यांच्या डोक्यामध्ये दगड घालून निर्घृणपणे खून करण्यात आला.

 

दरम्यान, मृत माजी नगरसेवक विजय ताड यांचे बंधू विक्रम ताड यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीमध्ये संदीप उर्फ बबलू चव्हाणने त्याच्या साथीदारासोबत आपल्या भावावर गोळ्या झाडून आणि दगड घालून खून केल्याची तक्रार दिली आहे. त्याचबरोबर फिर्यादीमध्ये जत भाजपचे माजी नगरसेवक उमेश सावंत यांचाही उल्लेख करण्यात आला होता.

 

माजी नगरसेवक विजय ताड खून प्रकरणातील संशयितांची नावे पाहण्यासाठी क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!