माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. २० मार्च २०२३ : जत : तालुक्यात एका अल्पवयीन पीडित मुलीवर बलात्कार करून तिच्या आई व वडील यांना मारहाण केल्याप्रकरणी, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध व विनयभंग या कलमान्वये नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद संबंधित पीडित मुलीने दिली. ही घटना गुरुवारी (दि. १६) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी गणेश शिवाजी ऐवळे, अभिषेक पांडुरंग ऐवळे, शिवाजी लक्ष्मण ऐवळे, दुर्गाप्पा अण्णाप्पा ऐवळे, पिराजी आण्णाप्पा ऐवळे, धनाजी लक्ष्मण ऐवळे, बापू रामा खांडेकर , पांडुरंग म्हाळाप्पा ऐवळे , अक्षय रणधीर ऐवळे या ९ जणांवर अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मारामारी, शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपी अद्याप फरार आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपी गणेश ऐवळे याने एका पीडित अल्पवयीन पीडीतेवर बलात्कार केला. याबाबतची माहिती संबंधित पीडित मुलीने आई-वडिलांना दिली. पीडिताच्या वडिलांनी आमच्या मुलीशी असे वर्तन का केले असे विचारताच गणेशच्या नातेवाईकांनी पीडिताच्या आई-वडील व नातेवाईकांना स्टीलच्या पाईपने मारहाण करत धमकी दिली. याप्रकरणी नऊ जणावर गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.