माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. २० मार्च २०२३ : आटपाडी : सांगली जिल्हा मजूर फेडरेशनच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार दिपाली गळवे यांचा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सांगली जिल्हा मजूर फेडरेशनची निवडणूक काल संपन्न झाली. यामध्ये आटपाडी तालुक्याच्या जिल्महा हिला राखीव प्रवर्गातील सर्वपक्षीय आघाडीच्या दिपाली गळवे या ३१६ मते घेत विजयी झाल्या.

विजयानंतर श्रीराम कॉलेज आटपाडी येथे जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी जेष्ठ नेते नाना माळी, मापटेमळ्याचे माजी सरपंच हणमंत गळवे, धनाजी खिलारी, धनाजी चव्हाण, अभिजित देशमुख, विनीत बनसोडे, गजानन बनसोडे, प्रकाश गळवे आदी मान्यवर उपस्थित होते.