Latest Marathi News

BREAKING NEWS

टीम इंडियाचा टी-२० चा हिरो वनडेत झिरो; त्याच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी देण्याची मागणी

0 430

भारतीय क्रिकेट टीमचा टी-२० मधील हिरो सुर्यकुमार यादव चा एकदिवशीय क्रिकेटमध्ये खराब फॉर्म कायम आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पहिल्याच चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सूर्यकुमारला इनस्विंगरवर बाद केले. पहिल्या वनडेतही स्टार्कने सूर्याला बाद केले होते. त्यामुळे त्याच्या जागी आता संजू सॅमसनल संधी दिली जावी, अशी मागणी जोर धरत आहे.

 

मागील १० वनडे डावातील सूर्यकुमार यादवची कामगिरी

 

Manganga

खरे तर सूर्यकुमार यादवला एकदिवसीय क्रिकेटमध्ये मर्यादित संधी मिळाल्या आहेत, पण त्याचा फायदा घेण्यात तो अपयशी ठरला आहे. सूर्याने आतापर्यंत २२ एकदिवसीय सामन्यांच्या २० डावांमध्ये २५.४७ च्या सरासरीने ४३३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून दोन अर्धशतके झळकली. शेवटच्या १४ डावांमध्ये, सूर्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. यादरम्यान तो केवळ पाच वेळा दुहेरी आकडा गाठू शकला, ज्यामुळे त्याची एकदिवसीय क्रिकेटमधील खराब स्थिती स्पष्ट होते.

 

मागील १० वनडे डावातील सूर्यकुमार यादवची कामगिरी

 

सूर्यकुमार यादवने १८ जुलै २०२३ रोजी कोलंबो येथे श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या सामन्यात त्याने नाबाद ३१ धावा करून खूप प्रभावित केले. त्यानंतर दुसऱ्या वनडेतही सूर्याने अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर असे वाटत होते की सूर्या मधल्या फळीत एक मजबूत खेळाडू म्हणून उदयास येईल, परंतु ९ फेब्रुवारी २०२२ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध ६४ धावांची इनिंग खेळल्यानंतर त्याने आपली लय गमावली.

 

 

सुर्यकुमार यादव च्या जागी या खेळाडूला संधी मिळावी : चाहत्याकडून होतेय मागणी : सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!