Latest Marathi News

BREAKING NEWS

गौतमी पाटील बाबत, लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर म्हणाल्या……

0 1,877

लावणीची विटंबना होत असताना मनाला दुःख वाटत असल्याची खंत लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी व्यक्त केली. लावणी कशी असते ही दाखविण्याची वेळ आली आहे. ज्याच्या त्याच्या हिशोबाने जे ते पोट भरत असल्याचे सांगत गौतमी पाटील यांच्यावर बोलताना अंगभर कपडे घालून लावणीचे सादरीकरण करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

वयाच्या आठव्या वर्षी मी या क्षेत्रात आले. शाळा मला माहिती नाही. लावणीसाठी मी योगदान दिले. लावणी लोक बघत नव्हते. महिला पुरुषांना लावणी पाहण्यासाठी पाठवत नव्हते. मी लावणी परदेशापर्यंत पोहोचवली. लावणी टिकली पाहिजे. महिलांनी बघितली पाहिजे. लावणीने मला घडविले. आता लावणीची विटंबना होत असताना मनाला दुःख वाटते. प्रत्येक ठिकाणी लावणीची विटंबना होत आहे. लावणीचे व्यवस्थित सादरीकरण होत नाही. लावणीचा पारंपरिकपणा जपला जात नाही.आता जे चालले आहे. त्याला लावणी न म्हणता डीजे शो चालला आहे. लावणीचा वेगळाच प्रकार आल्याची खंत सुरेखा पुणेकर यांनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!