भारतीय बाजारात सध्या मोबाईल सेंगमेंटमध्ये अनेक चिनी कंपन्या राज्य करत आहे. आज ग्राहक Vivo, Xiaomi आणि OPPO सारख्या कंपन्यांचे स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहे. मात्र आता या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये भारतीय मोबाईल कंपनी Lava नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.
कंपनीने काही दिवसापूर्वी Lava Blaze 5G लॉन्च केले आहे ज्यामध्ये ग्राहकांना दमदार फीचर्स मिळतात. तसेच या फोनची किंमत देखील खूपच कमी आहे. यातच आता बाजारात पुन्हा एकदा मोठा धमाका करत Lava Blaze 2 आणणार आहे. मुकुल शर्माने यांनी मोबाईलची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स शेअर केले आहेत. त्यानुसार, Lava Blaze 2 भारतीय मोबाइल बाजारात एप्रिल महिन्यात लॉन्च होईल. या हँडसेटची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते.

Lava Blaze 2 Unisoc T616 प्रोसेसरने सुसज्ज असेल. जे 12nm प्रोसेसरसह एंट्री-लेव्हल ऑक्टा-कोर SoC वर असेल. दोन वेगवान ARM कॉर्टेक्स A75 कोर 2 GHz पर्यंत क्लॉक केलेले आणि सहा पॉवर-कार्यक्षम ARM कॉर्टेक्स A55 कोर 1.8 GHz पर्यंत क्लॉक केलेले आहेत.