Latest Marathi News

BREAKING NEWS

Alto आणि Swift वर मात, किंमत फक्त ६.५६ लाख, मायलेज २२ kmpl : देशातील बाजारात सध्या ‘ही’ कार घालतेय धुमाकूळ

0 1,630

Car : भारतामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणत सगळ्यात जास्त लोक हे मध्यमवर्गीयात मोडतात. त्यामुळे पाच लाख रुपयापासून ते १० लाख रुपया पर्यंत च्या चारचाकी गाड्या या मध्यमवर्गीयामध्ये लोकप्रिय आहेत. फेब्रुवारी महिन्यात हॅचबॅक कारची मोठी विक्री झाली असली तरी यातील पहिल्या पाच मध्ये चार गाड्या या हॅचबॅक सेगमेंट मधील आहेत. मारुती सुझुकी अल्टो आणि स्विफ्ट ही दोन अशी नावे आहेत ज्यांना ग्राहकांकडून खूप प्रेम मिळत आहे. मात्र, फेब्रुवारी महिन्यात मारुतीच्या एका कारने अल्टो, स्विफ्ट आणि वॅगनआर सारख्या गाड्यांना मागे टाकत बेस्ट सेलिंग कार्सचा किताब पटकावला आहे

मारुती सुझुकी बलेनो ही फेब्रुवारी २०२३ मध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. गेल्या महिन्यात १८,५९२ युनिट्सची विक्री झाली, तर फेब्रुवारी २०२२ मध्ये १२,५७० युनिट्सची विक्री झाली. म्हणजेच वार्षिक आधारावर त्याची विक्री ४७.९१ टक्क्यांनी वाढली आहे. मारुती बलेनोची किंमत ६.५६ लाख ते ९.८३ लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. तर मारुती स्विफ्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने फेब्रुवारी २०२३ मध्ये १८,४१२ युनिट्सची विक्री केली आहे. तर फेब्रुवारी २०२२ मध्ये १९,२०२ युनिट्सची विक्री झाली. म्हणजेच, त्याच्या विक्रीत ४.११ टक्क्यांची (वार्षिक) घट नोंदवली गेली आहे.

Manganga

फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या कार 

१. Maruti Baleno – १८,५९२

२. Maruti Swift – १८,४१२

३. Maruti Alto – १८,११४

४. Maruti WagonR – १६,८८९

५. Maruti Dzire – १६,७९८

६. Maruti Brezza – १५,७८७

७. Tata Nexon – १३,९१४

८. Maruti Suzuki Eeco – ११, ३५२

९. Tata Punch – ११,१६९

१०. Hyundai Creta – १०,४२१

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!