माणदेश एक्स्प्रेस न्युज : दि. १८ मार्च २०२३ : आटपाडी : आटपाडी येथील विष्णू ज्ञानेश्वर राक्षे (वय 76) यांचे वृद्धपकाळाने आज सकाळी निधन झाले.
ते आटपाडी तालुका तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष गणेश राक्षे व राज्य उत्पादक शुल्क उपनिरीक्षक श्यामसुंदर राक्षे यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन दिनांक २० मार्च २०२३ रोजी सकाळी होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
