Cricket : ख्रिस गेल नाव जरी समोर आले तरी गोलंदाजाना डोळ्यापुढे दिवसा तारे चमकायला लागतात. याचा प्रयत्न नुकताच श्रीलंकेच्या स्टार क्रिकेटपटूला आला.
सध्या सुरु असलेल्या लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये गेलने त्याचा जलवा दाखवला आहे. श्रीलंकेचा स्टार खेळाडून तिलकरत्ने दिलशानला सलग तीन षटकार ठोकले. गेलच्या वर्ल्ड जायंट्स संघाचा पराभव झाला, पण गेलने ठोकलेले षटकार अजूनही खेळाडू्ंच्या आणि प्रेक्षकांच्या नजरेत आहेत. गेलने ठोकलेल्या षटकार हॅट्रिकचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

वरूण राज्याच्या कृपेने एशिया लायन्स आणि वर्ल्ड जायंट्स यांच्यात २० ऐवजी १० षटकांचा सामना खेळवण्यात आला होता. एशिया लायन्सने १० षटकांत ९९ धावा फलकावर लगावल्या होत्या. त्यानंतर १०० धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वर्ल्ड जायंट्सला मात्र ५ विकेट्स गमावत ६४ धावाच करता आल्या. गेलने या इनिंगमध्ये १६ चेंडूत २३ धावा कुटल्या. गेलने त्यांच्या संघाकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या.
हे ही वाचा
* आटपाडी मध्ये महामोर्चा : ५० टक्के पगारावरती बेरोजगारांना भरती करून घ्या : सोमवारी निघणार मोर्चा
* ब्रेकिंग : किसान सभेच्या लॉंग मार्चमधील शेतकऱ्याचा मृत्यू
* गौरवास्पद : आटपाडी पोलीस ठाणेच्या दोघांचा पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते सन्मान
पहा व्हिडीओ