माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. १७ मार्च २०२३ : मुंबई : शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात काढण्यात आलेल्या किसान सभेच्या लॉंग मार्चमधील शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पुंडलिक जाधव असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. पुंडलिक जाधव हा शेतकऱ्याच्या मृत्यूची वार्ता समजताच शहापूर येथील ग्रामीण रूग्णालयाबाहेर आंदोलक शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेने नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च सुरु आहे. आज (16 मार्च) या लाँग मार्चचा पाचवा दिवस आहे. या मोर्चाचा ठाण्यात मुक्काम आहे. याच मोर्चातील पुंडलिक जाधव या शेतकऱ्याला आज अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना ठाण्यातील शहापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी काही क्षणात आंदोलकांपर्यंत पोहोचली. त्यामुळे आंदोलकांनी रूग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे.

हे ही वाचा
* गौरवास्पद : आटपाडी पोलीस ठाणेच्या दोघांचा पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते सन्मान
* आटपाडी पंचायत समिती जवळ झालेल्या अपघातात युवक जखमी
* सांगली : भाजप नगरसेवकाची भरदिवसा गोळ्या घालून हत्या : हल्लेखोर पसार