माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. १७ मार्च २०२३ : आटपाडी : आटपाडी पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेल्या पोलीस नाईक व पोलीस कॉन्स्टेबल यांचा विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
आटपाडी पोलीस ठाणे येथे पोलीस नाईक व पोलीस कॉन्स्टेबल पदी कार्यरत असलेले अनुक्रमे नितीन लोखंडे व तुकाराम ढोले यांनी चिंचघाट येथे एक महिला अत्यवस्थेत पडलेली आहे. हे डायल ११२ वर प्राप्त होताच १७ किमी अंतरावर असलेले ठिकाणी अवघ्या २० मिनीटांत पोहचून सदर महिलेस उपचाराकरीता ग्रामीण रूग्णालय, आटपाडी येथे व तेथून सिव्हील हॉस्पीटल, सांगली येथे तात्काळ दाखल करून सदर महिलेचे प्राण वाचविले होते.

तसेच त्या महिलेची अधिक चौकशी केली असता तिचा नवरा व त्याचा साथीदार यांनी तिला मुलगा होत नाही, म्हणून मुंबई येथून आणून तिला चिंचघाट येथे घेवून जावून दोरीने फास लावून ती मेली आहे असे समजून तिला तेथेच फेकून निघून गेले होते. सदरबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कामगिरीबद्दल त्यांना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलारी तसेच सांगली पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या हस्ते प्रशंसा पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
हे ही वाचा
* आटपाडी पंचायत समिती जवळ झालेल्या अपघातात युवक जखमी
* सांगली : भाजप नगरसेवकाची भरदिवसा गोळ्या घालून हत्या : हल्लेखोर पसार
* आटपाडी : युवतीवर शारीरिक अत्याचार : खानजोडवाडी येथील तिघांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल