माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. १७ मार्च २०२३ : आटपाडी : आटपाडी पंचायत समिती समोर झालेल्या अपघातामध्ये युवक गंभीर जखमी झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी बस स्थानक येथून एस.टी. बस (MH-14-BT-3255) ही आटपाडी आगारामध्ये निघाली होती. सदरची बस आटपाडी पंचायत समिती जवळ आली असता, पोलीस चौकातुन आबानगरकडे दुचाकीवरून (MH-13-E-9736 ) प्रताप बालटे हा युवक निघाला होता. याच वेळी पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या चारचाकी वाहनाने प्रताप बालटे याच्या मोटारसायकलने धडक दिल्याने त्याच्या मोटारसायकलची धडक एस.टी. बसला दिली व तो एस.टी. बसच्या मागील चाकाखाली आल्याने त्यास गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर या ठिकाणी मोठी गर्दी झाली. यावेळी अपघातग्रस्त प्रताप बालटे या युवकास अजित लिगाडे यांनी तातडीने दुसऱ्या गाडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्यावरून बाजूला करण्यात आल्यावर वाहतूक सुरळीत झाली.
हे ही वाचा
* सांगली : भाजप नगरसेवकाची भरदिवसा गोळ्या घालून हत्या : हल्लेखोर पसार
* आटपाडी : युवतीवर शारीरिक अत्याचार : खानजोडवाडी येथील तिघांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल
* आम. अनिलभाऊ बाबर यांच्या मंत्रीपदासाठी रक्तानं पत्र लिहणाऱ्या शेतकऱ्याचा सत्कार