Latest Marathi News

BREAKING NEWS

सांगली : भाजप नगरसेवकाची भरदिवसा गोळ्या घालून हत्या : हल्लेखोर पसार

0 1,789

माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. १७ मार्च २०२३ : जत : जतमधील भाजपाचे माजी नगरसेवक विजय ताड यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून हत्या केल्याची घटना भरदिवसा सांगोला रस्त्यावरील अल्फोन्सा स्कूलजवळ घडली. या प्रकारामुळे जत शहरासह तालुक्यात खळबळ माजली आहे.

 

भाजपचे माजी नगरसेवक विजय शिवाजीराव ताड हे आज दिनांक १७ मार्च २०२३ शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास सांगोला रस्त्यावर असलेल्या अल्फोन्सा स्कूलमधून मुलांना आणण्यासाठी मोटारीतून गेले होते. महामार्गावरून शाळेच्या दिशेने वळल्यानंतर अज्ञात दोघांनी मोटारीवर गोळीबार केला. यामुळे मोटार बंद पडली. मोटारीतून खाली उतरून ते पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पुन्हा त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात जखमी होऊन जमिनीवर पडताच हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात दगड घातला. यात ते जागीच ठार झाले.

Manganga

 

भाजपमधून ते नगरपालिकेवर निवडून येण्याअगोदर त्यांनी शिवसेनेचे तालुकाप्रमुख म्हणून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला असून, भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे जत शहरासह तालुका हादरला आहे.

हे ही वाचा 

*  आटपाडी : युवतीवर शारीरिक अत्याचार : खानजोडवाडी येथील तिघांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल

* आम. अनिलभाऊ बाबर यांच्या मंत्रीपदासाठी रक्तानं पत्र लिहणाऱ्या शेतकऱ्याचा सत्कार

* आटपाडी आगाराची ‘त्या’ चालकावर कारवाई : बस चालवत असताना मोबाईलवर बोलत असल्याचा व्हिडीओ समोर आल्यावर केले निलंबित

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!