माणदेश एक्स्प्रेस न्यूज : दि. १७ मार्च २०२३ : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील करगणी येथून बेपत्ता झालेल्या तीन मुलांचा तपास लागला असून सदरची मुले सापडली आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी तालुक्यातील करगणी येथून शौर्य मारुती बोडरे वय 13, स्वप्नील बाळासो भोसले वय 13 आणि प्रसाद सुभाष मंडले वय 13 सर्व हे दिनांक 15/3/2023 रोजी 13.30 ते 17.30 वा. चे दरम्यान श्रीराम हायस्कूल आटपाडी येथे जाऊन येतो असे सांगून निघून गेले होते. ते परत घरी गेले नाहीत म्हणून आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्ह्याचे तपासणी तात्काळ पोलीस पथके रवाना करण्यात आलेली होती.त्यानुसार सदर अपहरित मुले हे आटपाडी बस स्थानक येथे मिळून आल्याने त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ते पंढरपूर येथे पारवे पक्षी विकत घेण्याकरिता निघाले असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर मुलांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास करीत असून सदर तपास कमी पोलिस उप निरीक्षक अजित पाटील, पो.हे.का.राकेश पाटील, पो.का.संभाजी सोनवणे यांनी सहभाग घेतला.