माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. १६ मार्च २०२२ : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील करगणी येथून तीन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याने करगणी परिसरामध्ये खळबळ माजली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शौर्य मारुती बोडरे , वय १३, स्वप्निल बाळासो भोसले, वय १३ व प्रसाद सुभाष मंडले, वय १३ वर्ष हे श्रीराम हायस्कूल आटपाडी येथे शाळेला जावून येतो असे सांगून घरातून गेले होते. परंतु अद्याप पर्यंत त्यांचा कोणताही ठावठिकाण आढळून आला नाही. कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांना फूस लावून पळवून नेले आहे.

याबाबत फिर्यादी मारुती काशिनाथ बोडरे यांनी आटपाडी पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद झाला असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोउनि पाटील करीत आहेत.